ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट अंतराने आपल्या मित्र आणि शत्रू राशींमध्ये गोचर करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनासह देश आणि जगावर दिसून येतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव १५ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करत असून मीन राशीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि गुरू यांच्यात मैत्रीचं नातं आहे. त्यामुळेच या दोन्ही ग्रहांच्या गोचरला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते. या गोचरमुळे ३ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तर या ३ भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
वृषभ राशी –
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. कारण सूर्य हा तुमच्या गोचर कुंडलीच्या केंद्रस्थानाचा स्वामी चतुर्थेश होऊन लाभदायक स्थानात भ्रमण करेल. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच उत्पन्नातही वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्यासह ज्या लोकांचा व्यवसाय निर्आत आणि आयातशी संबंधित आहे, त्यांना चांगला नफा मिळू शकतो. स्टॉक मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. घरात एखादा शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक काम नियोजनपूर्वक करायला हवं.
हेही वाचा- ३० वर्षांनंतर तयार झाला ट्रिपल ‘नवपंचम योग’; ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? मिळू शकतो अमाप पैसा
मिथुन राशी –
सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत सूर्यदेव तृतीय स्वामी होऊन कर्मस्थानावर येतील. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते आणि नफाही होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला मार्चनंतर प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेकांचे त्यांच्या आवडीच्या ठिकाणी ट्रांसफर होऊ शकते. शनिदेव तुमच्या भाग्यच्या ठिकाणी विराजमान आहेत. त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. परंतु यावेळी भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
तूळ राशी –
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे गोचर लाभदायक ठरू शकते. या काळात तुम्हाला कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळू शकते. तसेच, शाररीक आजारांपासून मुक्ती मिळू शकते. तुमचा व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी होण्यासह तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिवाय तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा गृहितके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)