Jupiter Planet Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि या राशी बदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. हा बदल काहींसाठी यशाने भरलेला असतो आणि काहींसाठी अपयश आणतो. देवांचा गुरु बृहस्पती १२ एप्रिल रोजी स्वतःच्या राशीत मीन राशीत प्रवेश केला आहे आणि ते २२ एप्रिल २०२३ पर्यंत येथेच राहतील.
वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, वृद्धी, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य असे मानले जाते. त्यामुळे गुरूच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी…
वृषभ: तुमच्या राशीतून गुरु ग्रह ११ व्या भावात प्रवेश करत आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले पैसे मिळू शकतात. तसेच, व्यवसाय करार देखील अंतिम केला जाऊ शकतो. जे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. तसंच तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. बॉस तुमच्यावर खुश होतील. तसंच नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा वेळ खूप अनुकूल आहे. तो सुरू करू शकता. तसंच, गुरु हा तुमच्या ८ व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे सध्या संशोधन क्षेत्राशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. तसंच, यावेळी तुम्ही पुष्कराज घालू शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
आणखी वाचा : ज्योतिष शास्त्रानुसार या ३ राशीच्या मुली वडिलांचे नाव उज्वल करतात
मिथुन: गुरूचे राशीपरिवर्तन तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारण गुरु हा ग्रह तुमच्या दशम भावात संचार करेल. ज्याला नोकरी आणि कामाची जागा समजली जाते. त्यामुळे, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसंच, यावेळी तुमची बढती आणि मूल्यांकन होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसंच नवीन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
दुसरीकडे, मार्केटिंग आणि मीडिया या क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ शुभ आहे. दुसरीकडे, मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि गुरु ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. बृहस्पती आणखी मजबूत करण्यासाठी, तुम्ही हळदीचा तिलक लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
आणखी वाचा : Shani Vakri 2022 : १४१ दिवस शनिदेव राहणार वक्री, या ३ राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान, जाणून घ्या खास उपाय
कर्क : गुरु ग्रह २०२३ मध्ये तुमच्या नवव्या भावात प्रवेश केला आहे, ज्याला भाग्याचे घर आणि परदेशगमनाचे स्थान म्हटले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसंच, व्यवसायात जे सौदे थांबले होते ते देखील अंतिम केले जाऊ शकतात. तसंच आपण व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता, जे आपल्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल्स, रेस्टॉरंटशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे.
दुसरीकडे, गुरू ग्रहाच्या या बदलामुळे कर्क राशीचे लोक आपली उद्दिष्टे आणि कार्ये पूर्ण करू शकतील. दुसरीकडे, गुरु ग्रह हा तुमच्या सहाव्या घराचा स्वामी आहे, ज्याला रोग आणि शत्रूचे घर म्हटले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला शत्रूंवर विजय मिळेल आणि गुप्त शत्रूंचा नाश होईल. यासोबतच तुम्हाला कोणत्याही जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. यावेळी तुम्ही पुष्कराज घालू शकता.