सूर्य संक्रमण २०२२ : सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह मजबूत स्थितीत असतो, त्याला समाजात खूप मान-सन्मान आणि नोकरीत उच्च स्थान मिळते. हा सिंह राशीचा शासक ग्रह आहे. सूर्याचे मित्र म्हणजे चंद्र, मंगळ आणि गुरू. तर शत्रू शुक्र आणि शनि आहेत. १४ एप्रिल रोजी सूर्य देव त्याच्या उच्च राशीत मंगळात प्रवेश करणार आहे. जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांना या मार्गक्रमणातून प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus) : या संक्रमणातून चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरीत उच्च पद मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही हे संक्रमण शुभ सिद्ध होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. या काळात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना देखील करू शकता.

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

मिथुन (Gemini) : या संक्रमणाचा परिणाम म्हणून आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होईल. शत्रूंचा पराभव करण्यात तुम्ही सक्षम व्हाल. या काळात प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यात यशस्वी व्हाल.

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर…”, ‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाची भूमिका साकरणारे मुकेश ऋषी यांचे वक्तव्य चर्चेत

कर्क (Cancer) : हा काळ कार्यक्षेत्रात अपार आनंद देईल. नोकरीत असलेल्या लोकांना प्रगती होण्याची शक्यता आहे. जे सरकारी क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ फलदायी ठरेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. पगारदार लोकांचे पगार वाढू शकतात.

आणखी वाचा : “मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

कन्या (Virgo) : तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैयक्तिक जीवनात तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन प्रोजेक्टवर काम करू शकता. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल.

Story img Loader