Sun Planet Transit In Kanya: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या मित्र आणि स्वराशीमध्ये एका विशिष्ट वेळी भ्रमण करतो, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. सूर्य देव आपल्या मित्र ग्रह बुधच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्य देवाचे हे गोचर १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच या राशी बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यात यावेळी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कन्या

सूर्यदेवाचे गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून लग्न भवात गोचर करणार आहेत. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी खूप छान असेल. यावेळी, जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर व्यापारातून पैसाही वाढेल. याकाळात तुम्ही लोकप्रिय व्हाल. यासह, आपण सन्मान आणि आदर मिळवू शकता.

हेही वाचा – Mangal Gochar 2024 : ५५ दिवसांपर्यंत ‘या’ राशीच्या लोकांची होईल चांदी, २६ ऑगस्टपासून सुरू होणार अच्छे दिन

धनु

सूर्य देवाचा राशीतील बदल धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून कर्म स्थानी गोचर होणार आहे. त्यामुळे याकाळात तुमची व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीला या काळात हुशारी आणि कौशल्याने अधिकार्‍यांना प्रभावित करता येईल आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. त्याबरोबरच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. यातून व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. त्याच वेळी, तुमच्या वडिलांसह तुमचे संबंध चांगले राहतील. यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

हेही वाचा – देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा; एक वर्षानंतर शुक्र करणार स्वराशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती

मकर

तुमच्यासाठी सूर्य देवाची राशि गोचर लाभदायी ठरू शकते. हे गोचर तुमची राशीच्या नवव्या स्थानी होत आहे. त्यामुळे तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. तसेच तुमच्या कामाच्या संबंधातून प्रवास करू शकतात. या राशीच्या काही जातकांना परदेशात जाण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि या कालावधीत मुलांची पूर्ण साथ असते. बिजनसमध्ये आपल्या रणनीतीच्या माध्यमातून चांगले खास लाभ प्राप्त करण्यास सक्षम बनतील. धार्मिक आणि मांगलिक कार्यक्रम समाविष्ट करू शकता. या काळात विद्यार्थांना एखाद्या परिक्षेत यश मिळू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 12 months the sun will enter the virgo sign the golden time of this sign will begin good days will come snk