Jupiter Planet Gochar In 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. तब्बल १२ वर्षांनंतर गुरु ग्रह मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा तीन राशी आहेत, ज्यांना यावेळी प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष राशी

गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण बृहस्पति तुमच्या राशीतून चढत्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळू शकते. तसेच जोडीदारासोबतचे नाते या काळात घट्ट होईल. नोकरदारांना पदोन्नती व प्रगती मिळू शकते. तसेच जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. यासोबतच जे व्यावसायिक आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. कारण कुंडलीतील कर्म भावात गुरु संक्रमण प्रवास करेल. जे नोकरी आणि कामाचे ठिकाण मानले जाते. म्हणूनच या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. जे लोक आपल्या करिअरची सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. यासोबतच व्यावसायिकांना चांगला नफाही मिळू शकतो. दुसरीकडे, नोकरी व्यवसायाला बढती आणि वाढ करता येते.

( हे ही वाचा: १७ जानेवारी पर्यंत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? शुक्र-शनिची युतीने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत)

मीन राशी

गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यासोबतच ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात मिळू शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 12 years jupiter transit rashi parivartan in mesh rashi 2023 these zodiac sign can get huge amount of money gps