Mars-Jupiter conjunct in Taurus: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होतो. ज्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव काही राशींवर पडतो. काही महिन्यांपूर्वी मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश झाला असून या राशीमध्ये आधीपासून गुरू ग्रह उपस्थित आहे त्यामुळे या राशीत मंगळ आणि गुरूची युती निर्माण झाली आहे. तसेच लवकरच मंगळ वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करील. त्यामुळे पुढील काही दिवस हा योग काही राशींसाठी शुभ ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल १२ वर्षानंतर गुरू ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. तसेच या दोन्ही ग्रहांची युती शुभ मानली जाते. त्यामुळे हा काही राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल.
मंगळ-गुरूची युती तीन राशींसाठी खास
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरू आणि मंगळ ग्रहाची युती खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या धन, संपत्तीमध्ये वाढ होईल. आकस्मिक धनलाभ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. या काळात तुमची सगळी ध्येय पूर्ण होतील. भाग्याची साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तुमच्या वाणीत गोडवा येईल, त्यामुळे लोक तुमच्यावर इंप्रेस असतील.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. या युतीच्या शुभ प्रभावाने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. तुमचे व्यक्तित्व सुधारेल, सकारात्मक विचार कराल. पुढचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. अडकलेली कामे पूर्णत्वास जातील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवन सुखमय असेल. जोडीदारासोबत फिरायला जाल.
मकर
गुरू आणि मंगळ ग्रहाच्या युतीच्या प्रभावाने मकर राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे प्रेमसंबंध मजबूत होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. या काळात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील. नव्या कार्याची सुरुवात होईल.आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. लग्न ठरतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)