Surya And Guru Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करुन इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. आता सूर्यदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. तर एप्रिल महिन्यात सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. जिथे देवगुरु आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे मेष राशीत देवगुरु आणि सूर्यदेवाची युती होणार आहे. ही युती तब्बल बारा वर्षांनंतर होणार आहे. या युतीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा तीन राशी आहेत, ज्यांना या युतीमुळे अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे, पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींना होणार धनलाभ?

धनु राशी

गुरु आणि सूर्यदेवाच्या युतीमुळे धनु राशीच्या लोकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमचा बँक बँलन्स वाढण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरु शकतात. भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. 

(हे ही वाचा : १५ दिवसांनी बुधदेव ‘या’ राशींना देणार अपार धन? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतात लखपती )

मकर राशी

गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. जे लोक राजकारणात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकतो. 

मीन राशी

गुरु आणि सूर्यदेवाची युती मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच तुमची पगारवाढ होऊ शकते. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मानात वाढ होऊ शकते.  

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)