Gajkesari Yog 2025: ज्योतिषशास्त्रात गुरु आणि चंद्र हे दोन्ही शुभ ग्रह मानले जातात. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्याचा माणसाच्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार २०२५ मध्ये १२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्र मिथुन राशीत येऊन गजकेसरी योग तयार करतील. हा योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. १४ मे २०२५ पर्यंत गुरु वृषभ राशीत राहील, त्यानंतर तो पुन्हा मिथुन राशीत येईल जेथे १२ वर्षांनी गुरू आणि चंद्राचा संयोग मिथुन राशीमध्ये होईल. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात या राशींना नशिबाचा पूर्ण लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन

मिथुन राशीसाठी गजकेसरी योग अतिशय शुभ राहील. तुमचा कामाचा वेग वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळू शकेल. या वर्षी तुम्हाला नवीन ज्ञान देखील मिळेल, जे भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनात चांगले बदल होऊ शकतात आणि प्रेम जीवनातही आनंद येईल. तसेच संपत्तीतही वाढ होऊ शकते.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी 2025 मध्ये गजकेसरी योग शुभ राहील. मे नंतर तुम्ही यशाकडे वाटचाल कराल. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात आणि बेरोजगार लोकांना इच्छित नोकरी मिळू शकते. काही लोक स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. आर्थिक समस्या दूर होतील आणि प्रेमसंबंध सुधारतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीही हे वर्ष शुभ राहील.

हेही वाचा –Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य

धनु
धनु राशीच्या लोकांना गजकेसरी योगामुळे कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. विशेषतः वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि काही लोकांना चांगला जीवनसाथी मिळू शकेल. सामाजिक स्तरावर तुमची ओळख वाढेल. करिअरमध्येही यश मिळू शकते. संपत्तीतही वाढ होईल. जे लोक मीडिया किंवा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, त्यांच्या कामाला ओळख मिळू शकते.

हेही वाचा –Taurus Yearly Horoscope 2025: वर्ष २०२५ वृषभ राशीच्या लोकांसाठी कसे असेल? नववर्षात कसे असेल वैवाहिक जीवन?

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग मानसिक शांती देईल. घर आणि कुटुंबाचे प्रश्न सुटतील. तुम्ही पालकांबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. प्रेम जीवनातही चांगले बदल होतील आणि काही लोक प्रेमसंबंधात येऊ शकतात. आर्थिक स्थितीही सुधारेल. मे 2025 नंतर तुमची संपत्ती वाढू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 12 years the alliance of jupiter and moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025 opportunities will arise to buy a house and vehicle snk