Mahashivratri 2025: हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. यंदा २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवशी भगवान महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा-आराधना आणि व्रत केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार महशिवरात्रीच्या शुभ दिनी काही ग्रहदेखील दुर्लभ योग निर्माण करणार आहेत. महाशिवरात्रीला शुक्र उच्च राशी मीनमध्ये राहणार असून राहूदेखील याच राशीत विराजमान असेल. तसेच सूर्य शनीच्या कुंभ राशीमध्ये असेल. असा योग जवळपास १५२ वर्षानंतर निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार आहे. या राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभासह अनेक शुभ परिणाम जाणवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाशिवरात्रीचा दिवस तीन राशींसाठी लाभकारी

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी निर्माण होणार शुभ संयोग खूप लाभदायी असेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल. सरकारी कामात मदत मिळेल. या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन

मिथुन राशीसाठी देखील हा संयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

मकर

हा शुभ संयोग मकर राशीच्या व्यक्तींचे भाग्य बदलेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. नवी नोकरी मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. सहकर्चचाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)