ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो, त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत आहे. राहु ग्रह १७ मार्च रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह मानले जाते. तसंच, वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला कठोर वाणी, शेअर्स, प्रवास, त्वचा रोग, धार्मिक यात्रा, परदेश प्रवास, महामारी, राजकारण इत्यादींचा कारक म्हटलं आहे. राहूचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. पण ४ राशी आहेत, ज्यांना शेअर्स आणि बिझनेसमध्ये विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया या ४ राशी कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन राशी: यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. जे प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय क्षेत्राशी निगडीत लोकांसाठीही हे संक्रमण उत्तम ठरेल. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा अंमल आहे, त्यामुळे जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. लाभाची चिन्हे आहेत.

कर्क राशी: राहूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचे खूप कौतुक होईल. चंद्र राशीवर चंद्र राशीचे राज्य असते. त्यामुळे तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो. बराच काळ मंदावलेला व्यवसाय तेजीत येईल. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल आहे.

आणखी वाचा : Shani Gochar 2022 : शनी आपल्या आवडत्या राशीत करणार भ्रमण, या राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती

वृश्चिक : राहू देवाचे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. नवीन वर्षात तुम्ही पैसे कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. शेअर बाजारात तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीवर मंगर ग्रहाचे राज्य आहे. त्यामुळे या काळात लष्कर, इंजिनीअर, पोलीस, मेडिकल लाईनशी निगडीत असणारे डॉ. अशा लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. कुंडलीच्या पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या घरात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह भ्रमण करतो तेव्हा करिअर आणि नवीन नोकरीत बदल होतो.

आणखी वाचा : या ५ सवयींमुळे माणूस होऊ शकतो कंगाल, जाणून घ्या काय म्हटलंय चाणक्य नीतिमध्ये ?

कुंभ : राहूच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक शनीशी संबंधित काम जसे तेल, लोखंडाचे काम करत आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्ही संपत्ती जमा करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. कुंभ राशीवर शनीदेवाचे राज्य असते आणि ज्योतिष शास्त्रानुसार राहू देवाची शनीदेवाशी मैत्री असते. त्यामुळे या राशीच्या लोकांना शेअर बाजारात अचानक फायदा होऊ शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 18 months rahu will change the zodiac due to these transits the people of 4 zodiac signs get benefits prp