Tirgrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती निर्माण झाल्याने शुभ किंवा अशुभ संयोग निर्माण होतो. या संयोगाचा विविध प्रभाव मानवी जीवनावर पडतो. येत्या काळात तीन ग्रह एकत्र युती निर्माण करणार आहेत. सध्या राहू मीन राशीत प्रवेश विराजमान असून २७ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. १४ मार्च रोजी सूर्यदेखील त्याच राशीत प्रवेश करेल. त्यामुळे होळीच्या दिवशी राहू, बुध आणि सूर्य हे तीन ग्रह मीन राशीत त्रिग्रही योग निर्माण करतील. ज्याच्या शुभ प्रभावाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक क्षेत्रात यश

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग खूप अनुकूल सिद्ध होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल.

सिंह

त्रिग्रही योग सिंह राशीसाठी देखील भाग्यदायी ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी चांगली संधी प्राप्त होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनाही मीन राशीत निर्माण झालेल्या त्रिग्रही योगाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. आयुष्यात सुख-शांती येईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader