Shani Margi on Dhantrayodashi 2022: दिवाळीच्या पूर्वसंध्येला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. यादिवशी माता लक्ष्मी व कुबेराचे पूजन करण्याची पद्धत आहे. तसेच भारतीय संस्कृतीत उत्तम आरोग्य ही सुद्धा संपत्ती मानली जात असल्याने या संपत्तीच्या समृद्धीसाठी धन्वंतरीचे पूजनही केले जाते. धनत्रयोदशीला घरातील दागदागिने, वाहने व अन्य मौल्यवान वस्तूंची पूजा होते. द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार यंदा धनत्रयोदशीची तिथी ही २२ ऑक्टोबरलाच सुरु होत आहे. २२ ऑक्टोबर संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २३ ऑक्टोबर २०२२ च्या संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत धनत्रयोदशीच्या तिथी असणार आहे. यामुळे सोने खरेदी व पूजनासाठी दोन दिवसांचा कालावधी मिळत आहे.
धनत्रयोदशीला जुळतोय दुर्मिळ योग
ज्योतिषशास्त्रानुसार यंदा तब्बल २७ वर्षांनंतर धनत्रयोदशीला अत्यंत शुभ योग तयार होत आहे. पंचांगानुसार २३ ऑक्टोबरला शनि देव मकर राशीत मार्गी होणार असून याच दिवशी धनत्रयोदशीची तिथीही सुरु आहे. यामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेने काही राशींना करिअरमध्ये हवी तशी प्रगती लाभण्याचाही योग आहे. तसेच मिळकतीचे स्रोत वाढून तुम्हाला अचानक धनलाभाचे संधी मिळू शकते. यंदा धनत्रयोदशीला सर्वार्थ सिद्धी हा दुर्मिळ योग जुळून आला आहे.
शनिची कृपादृष्टी बरसणार…
शनि गोचर करून मकर राशीत मार्गी होणार असल्याने मुख्यतः मकर राशीला लाभाची मोठी संधी आहे. शनि हा कुंभ राशीचा स्वामी मानला जातो त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात धनलाभ व प्रगतीचा योग आहे, मात्र यासाठी तुम्ही किती मेहनत करता हे सुद्धा महत्त्वाचे ठरेल. तुमच्या मेहनतीला दिशा देण्याचे काम शनिदेव करू शकतात, मकर, कुंभ या राशींसह तिसरी सर्वात प्रभावी रास मीन ठरू शकते. मीन राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळीचा सण काही गोड बातम्या घेऊन येऊ शकतो. आपली प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी शनिदेवाची साथ मिळू शकते.
Diwali 2022: दिवाळीत तुमच्या राशीनुसार करा लक्ष्मी पूजन; धन, समृद्धी व प्रगतीचे जुळून येतील योग
धनत्रयोदशी पूजा मुहूर्त
धनत्रयोदशीला सोने खरेदीसह लक्ष्मीच्या पूजनालाही महत्त्व आहे. पंचांगानुसार, देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटे ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत असेल. यादिवशी पूजेला देवीसाठी लाल किंवा पिवळे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)