वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार गोचर ग्रह वेळोवेळी शुभ आणि अशुभ असे योग तयार करतात. ज्याचा परिणाम अनेकदा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला दिसतो. यंदा ३० वर्षांनी शनिदेवाच्या राशीत अत्यंत दुर्मीळ व शुभ राजयोग तयार झाला आहे. मकर राशीतील सूर्य-शुक्र यांचा संयोग आणि मुळ त्रिकोण राशीत शनी असल्याने हा योग तयार झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसण्याची शक्यता आहे. परंतु सर्व राशींमधील ३ राशींतील लोकांना धनलाभासह त्यांची प्रगती होण्याची संधी आहे. या राशी कोणत्या आहेत ते चला जाणून घेऊया.
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीतील लोकांसाठी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीच्या दहाव्या स्थानी तयार होत आहे. ज्याला कर्म स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकते. शिवाय तुम्हाला तुमच्या कष्टाने भरपूर पैसे मिळण्याचीही शक्यता असून या काळात तुम्ही नोकरी आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. या काळात तुमची बिघडलेली कामेही सुधारण्याची शक्यता आहे. तर नोकरदार वर्गातील मंडळींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- २१ एप्रिलला शनि व गुरू एकत्र येताच ‘या’ ४ राशी होतील श्रीमंत? तन मन धन ‘असे’ होऊ शकते समृद्ध
वृषभ राशी (Taurus Zodiac)
शनीचा राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून नवव्या स्थानी तयार होत आहे. ज्याला भाग्याचे आणि परदेशी स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्यावर मेहरबान असल्याचं दिसतं आहे. याशिवाय तुमची अनेक दिवसांपासूनची जी बिघडलेले कामे होती, ती या काळात पूर्ण होऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. याच काळात तुमच्या भौतिक सुखसुविधा वाढतील. मीडिया, फिल्म लाइन, फॅशन डिझायनिंग किंवा कला या क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो.
कर्क राशी (Cancer Zodiac)
कर्क राशीतील लोकांसाठी राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण या राशीतून सातव्या स्थानात हा योग तयार होत आहे. ज्याला वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे या काळात समाजात तुमची प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच वैवाहिक जीवनातील नाते मजबूत होऊ शकते. तर या काळात काही शुभ कार्यही पार पडू शकतात किंवा शुभ कार्यक्रमाचे आयोजन केलं जाऊ शकतं. तुम्ही परदेशी प्रवास करण्याचीही शक्यता असून भागीदारीच्या कामात चांगलं यश मिळू शकते.
(टिप : वरील लेख गृहितके व प्राप्त माहितीवर आधारीत आहे)