Kendra Tirkon Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठरावीक अंतराने राशी बदलतात; ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. साहजिकपणे त्यांचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर व जगावर दिसून येतो. अशातच वैभव आणि संपत्ती देणाऱ्या शुक्र ग्रहाने २ ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश केला आहे; ज्यामुळे आता ३० वर्षांनंतर केंद्र त्रिकोण असलेला राजयोग तयार होणार आहे. कारण- शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान आहेत आणि सिंह राशीत शुक्र विराजमान आहे. अशा परिस्थितीत या दोन राजयोगांच्या प्रभावामुळे चार राशींच्या लोकांची अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?
‘या’ राशींना राजयोगांच्या प्रभावामुळे लाभ होऊ शकतो.
मेष रास
केंद्र त्रिकोण राजयोग असल्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसायात मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते. तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी, व्यवसायात नवीन करार निश्चित केला जाऊ शकतो; ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. तसेच यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण आणि समसप्तक राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे यावेळी तुमचे नशीब चमकू शकते. तुम्हाला मालमत्तेच्या व्यवहारातही फायदा, लाभ होण्याची चिन्हे आहेत. या काळात नोकरदारांना बढतीसह मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच कामानिमित्त परदेशांत जाण्याची संधीही मिळू शकते.
मिथुन रास
केंद्र त्रिकोण राजयोग आणि समसप्तक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पंचमेश आणि नवमेशचा समसप्तक योग केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे. म्हणून, यावेळी तुमचा भाग्योदय होऊ शकतो. तसेच तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेतून पैसे मिळतील. मेहनतीचे फळही मिळू शकतो. व्यापार्यांना चांगला नफा मिळू शकतो आणि नोकरी करणार्यांना यावेळी प्रमोशन मिळू शकते.
हेही वाचा >> मंगळाचा शुक्राच्या राशीत प्रवेश होताच ‘या’ राशींना अचानक पैसा मिळणार? प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळण्याची शक्यता
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण आणि समसप्तक राजयोगाची निर्मिती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, पैसे आणि करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी शुभ संधी निर्माण होतील आणि तुम्हाला अपेक्षित परिणामही मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमच्या मान-सन्मानात वाढही होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)