Shani Enter Jupiter’s Sign: ज्योतिषशास्त्रानुसार शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षे लागतात. ही बाब लक्षात घेता, शनीला एकाच राशीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी कुंभ राशीत असून, २०२५ मध्ये तो मीन राशीत प्रवेश करील. मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. त्यामुळे शनीचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.
शनी करणार मालामाल
वृषभ
शनीचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. भौतिक सुखात वाढ होईल. नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य द्याल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. धार्मिक कार्यात यश मिळेल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.
मिथुन
शनीचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
कर्क
शनीचे राशी परिवर्तन कर्क राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. नवी संधीही मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)