शनि संक्रमण २०२२ : अडीच वर्षांनंतर शनि देवता राशी बदलणार आहे. शनीचे हे गोचर २९ एप्रिल रोजी होणार आहे. काही लोकांना या गोचरचा फायदा होईल तर काहींना नुकसान होण्याची शक्यता आहे. काही राशींना शनि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. एप्रिल २०२२ मध्ये ३० वर्षांनंतर शनि कुंभ म्हणजे स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि त्यांना भरपूर संपत्ती मिळवण्यात यश मिळेल.
वृषभ (Taurus) : या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण शुभ राहील. तुमचे भाग्य उजळेल. या काळात भरपूर संपत्ती मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसाय असो की नोकरी, प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मोठी डील फायनल होऊ शकते. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जीवनात आनंदाची लहर येईल.
सिंह (Leo) : हा काळ तुम्हाला आर्थिक समृद्धी देणारा आहे. आर्थिक संकटातून सुटका मिळेल. पैसे जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी धंद्याद्वारे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. परदेश प्रवासाचीही संधी आहे. अडकलेले पैसे कुठून तरी मिळू शकतात.
आणखी वाचा : The Kashmir Files चित्रपटावर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कन्या (Virgo) : हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत व्हाल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला जीवनात अनेक क्षेत्रात लाभ मिळतील. नोकरी किंवा व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. नशीब तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे.
धनु (Sagittarius) : शनी गोचर तुमच्यासाठी धनलाभाचे योग आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. परदेश प्रवासाची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळेल.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)