ज्योतिषशास्त्रानुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून होते. त्यानुसार यंदाचा नवरात्रोत्सव रविवार, १५ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. १४ ऑक्टोबरला १६ दिवस सुरु असलेल्या पितृ पक्षाची समाप्ती झाली आहे. त्याचदिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील झाले. यानंतर आजपासून दुर्गादेवीच्या नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज अनेक शुभ योग घडत आहेत, जे अनेक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ३० वर्षांनंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शश राजयोग, भद्र योग आणि बुधादित्य योग असे अनेक शुभ योग तयार होणार आहेत. तीन योगांच्या निर्मितीमुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. ज्याचा प्रभाव काही राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. तसेच या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप आनंददायी ठरण्याची शक्यता आहे. ज्यामुळे या राशींवर दुर्गादेवीची विशेष कृपा राहू शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कर्क रास
ज्योतिषशास्त्रानुसार आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. याचा काही राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. नवरात्रीच्या सुरुवातीला त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात दुप्पट नफा मिळू शकतो. तसेच जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळात काही कामानिमित्त तुम्ही परदेश दौऱ्यावरही जाऊ शकता. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहू शकते.
सिंह रास
३० वर्षांनंतर तयार होणारा त्रिग्रही योग सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरु शकतो. या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. सर्व कामात देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या काळात घरामध्ये शुभ कार्य पार पडू शकतात.
कन्या रास
ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीसाठी त्रिग्रही योग अनुकूल परिणाम देणारा ठरु शकतो. या काळात तुमच्यावर देवीची विशेष कृपा होऊ शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. यावेळी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जे काम कराल ते यशस्वी होऊ शकता. व्यवसायातून चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे तर कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)