Surya Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याला नवग्रहांमध्ये सर्वात महत्वपूर्ण मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी परिवर्तन होते. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सप्टेंबर महिन्यामध्ये सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार असून या राशीत आधीपासून शुक्र ग्रहदेखील विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि सूर्याची युती शुक्रादित्य राजयोग निर्माण करेल. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी फळ देणारा ठरेल.

पंचांगानुसार, सूर्य १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी कन्या राशीमध्ये करणार असून काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम मिळतील.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कन्या राशीतील प्रवेशाने आणि शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने कर्क राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. उत्पन्नाचे नवे स्तोत्र मिळतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारीची साथ मिळेल.

वृश्चिक

कन्या राशीतील शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

हेही वाचा: ३३ दिवसानंतर पैसाच पैसा; वृषभ राशीत गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार भरपूर यश

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या कन्या राशीतील राशी परिवर्तनाने अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. या काळात नोकरीत पद-प्रतिष्ठा आणि पगार होईल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न राहील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)