Sun Transit In Meen: १७ फेब्रुवारीपासून शनि आणि सूर्य एकाच राशीत विराजमान आहेत. शनि सूर्याची ही युती काही राशींसाठी थोडी कठीण होती. यादरम्यान अनेक राशींच्या लोकांना त्रास सहन करावा लागला. पण आता १५ मार्चला सूर्य शनीच्या राशीतून बाहेर पडेल आणि मीन राशीत प्रवेश करेल. सूर्याचा हा प्रवेश काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल..
वृषभ राशी
सूर्य मीन राशीत प्रवेश करताच वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. याकाळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसंच याकाळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील हा काळ फायद्याचा ठरू शकतो.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते. याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. याकाळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसच तुम्ही लांबचा प्रवास करण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो, नोकरी करणाऱ्यांसाठी देखील हा काळ फायदेशीर आहे.
( हे ही वाचा: २०२३ संपेपर्यंत ‘या’ राशींना मिळू शकतो बक्कळ पैसा; गुरु- शुक्र युवा अवस्थेत प्रवेश करताच तुम्हीही व्हाल श्रीमंत?)
मकर राशी
सूर्यदेव शनीच्या राशीतून बाहेर पडताच मकर राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. याकाळात तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तुम्हाला उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील. याकाळात तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण राहील. याकाळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.