वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत आपली राशी बदलतो आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ राहतो. संपत्तीचा कारक असलेला शुक्र ग्रह ३१ मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशी ही शनिदेवाच्या अधिपत्याखाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे संक्रमण महत्त्वाचे आहे. या बदलाचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु तीन राशींना विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी.

मेष: मेष राशीच्या लोकांना कुंभ राशीत शुक्राच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. कारण शुक्र तुमच्या अकराव्या भावात संक्रमण करेल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, मालमत्ता आणि वाहन संबंधित व्यवहारात लाभ होऊ शकतो. यासोबतच शुक्र ग्रह तुमच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. तसेच पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते मिळू शकतात.

Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Loksatta kutuhal Discovery of aliens with the help of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परग्रहांचा शोध
The month of September will be lucky for these three zodiac signs
बक्कळ पैसा मिळणार; ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे सप्टेंबर महिना ‘या’ तीन राशींसाठी ठरणार लकी
article about painless normal delivery method of painless childbirth
स्त्री आरोग्य : वेदनारहित बाळंतपणाचा पर्याय
Surya Nakshatra Gochar 2024 | sun transit in Purva Phalguni Nakshatra
सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे ‘या’ तीन राशींना होणार अपार धनलाभ, सूर्यासारखं चमकणार नशीब
Mars-Jupiter conjunct in Taurus
आता नुसती चांदी! मंगळ-गुरूच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
kutuhal
कुतूहल: प्रगत हयूमनॉइड

मकर: शुक्राचे तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात भ्रमण होत आहे. या स्थानाला धन, कुटुंब आणि वाणीचे स्थान म्हटले जाते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळू शकते. तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. तर ज्या लोकांचं काम मार्केटिंग आणि वकील, शिक्षक या क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांना या काळात फायदा होऊ शकतो. दुसरीकडे मकर राशीवर शनिदेव राज्य करत असून शुक्र आणि शनि यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.

Grah Transit 2022: एप्रिलमध्ये नऊ ग्रह करणार राशी बदल, ‘या’ राशींसाठी धनलाभाचा योग

कुंभ: शुक्राचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र हा तुमच्या केंद्राचा आणि त्रिकोणाचा स्वामी आहे. त्यांना सुख आणि नववे घर म्हणतात. यावेळी तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या संक्रमण काळात शुक्र कुंभ राशीच्या लग्न भावात विराजमान असेल. यावेळी कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामाने खूश होतील. तुमची आर्थिक बाजूही मजबूत असेल. प्रॉपर्टी डीलर, रिअल इस्टेट एजंट, ट्रॅव्हल एजंट आणि ऑटोमोबाईल व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो.

शुक्र गोचर २०२२ तिथी

  • ३१ मार्च, गुरुवार, राशी कुंभ
  • २७ एप्रिल, बुधवार, राशी मीन
  • २३ मे, सोमवार, राशी मेष
  • १८ जून, शनिवार, राशी वृषभ
  • १३ जुलै, बुधवार, राशी मिथुन
  • ७ ऑगस्ट, रविवार, राशी कर्क
  • ३१ ऑगस्ट, बुधवार, राशी सिंह
  • २४ सप्टेंबर, शनिवार, राशी कन्या
  • १८ ऑक्टोबर, मंगलवार, राशी तूळ
  • ११ नोव्हेंबर, शुक्रवार, राशी वृश्चिक
  • ५ डिसेंबर, सोमवार, राशी धनु
  • २९डिसेंबर, गुरुवार, राशी मकर