Shukra Rashi Parivartan December 2022: ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींवर नऊ ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. त्यात ठराविक कालावधीनंतर ग्रह एक राशीतून दुसऱ्या राशीत गोचर म्हणजेच त्या त्या राशीत भ्रमण करत असतो. त्याचे परिणाम १२ राशींवर जाणवत असतात. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात. या वर्षअखेर प्रसिद्धी, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार शुक्र ५ डिसेंबरला धनु राशीत प्रवेश घेणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींना नशिबाची मजबूत साथ मिळून त्यांच्या धन संपत्तीत अचानक वाढ होऊ शकते. ५ डिसेंबर पासून कोणत्या राशींसाठी सुखाचा काळ सुरु होत आहे चला तर जाणून घेऊयात..

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. या दरम्यान तुम्हाला प्रगती आणि नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नवीन वर्षात तुम्ही तुमची उद्दिष्टे देखील साध्य करू शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. शुक्र हा प्रेमाचा ग्रह आहे त्यामुळे शुक्राच्या कृपेने मेष राशीच्या व्यक्तींच्या भाग्यात प्रेम योग बनू शकतात. जर आपण विवाह इच्छुक असाल तर लग्न जुळण्याची शुभ वार्ताही मिळू शकते. नववर्षात मेष राशीसाठी धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत त्यामुळे अनपेक्षितपणे तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा

सिंह

शुक्राचे संक्रमण तुम्हाला आर्थिकबाबीत लाभदायी ठरू शकते. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्र हा सिंह राशीच्या प्रभावकक्षेत पाचव्या स्थानी स्थिर होणार आहे. महिलांसाठी हे स्थान अत्यंत लाभदायक मानले जाते, नोकरी शोधात असलेल्या महिलांना येत्या काळात मोठ्या कंपनीकडून बड्या पगाराची नोकरीची ऑफर येऊ शकते.

हे ही वाचा << २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना श्रीमंतीचे प्रबळ योग; शनि साडेसातीने उजळू शकते नशिबाचे दार, तुमची रास काय सांगते?

वृश्चिक

शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी आनंदाच्या अनेक बातम्यांचा खजिना घेऊन येऊ शकते. या काळात तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या संक्रमणादरम्यान तुमचे संवाद कौशल्य वाढेल आणि बोलण्यात गोडवा येईल. तुम्ही सर्वांना प्रभावित करण्यात सक्षम व्हाल. तुम्हाला गुप्त धनाच्या प्राप्तीचे योग आहेत.

हे ही वाचा << २०२३ फेब्रुवारीत शनिदेव होणार अस्त; ‘या’ राशींना लक्ष्मीची मिळू शकते साथ, मित्रांमुळे ‘असा’ होऊ शकतो धनलाभ

कुंभ

कुंभ राशीच्या पंचम भावात शुक्राचे गोचर होणार आहे. नववर्षात आपले अडकलेली प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. शुक्र गोचर काळात तुम्हाला त्यांत लाभदायी अशी वेळ अनुभवता येऊ शकते, तुम्ही म्हणाल त्या कामात यश व प्रगतीचे योग तयार होत आहेत. डिसेंबर पासून तुमची प्रेमाची नाती तुमच्या आणखीन जवळ येण्याची शक्यता आहे. कुटुंबाची साथ लाभल्याने तुम्हाला मानसिक तणाव कमी झाल्याचे जाणवू शकते.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे देण्यात आला आहे)

Story img Loader