Mahashtami Grah Gochar 2024: हिंदू पंचांगानुसार, सध्या शारदीय नवरात्री सुरू असून ११ ऑक्टोबर रोजी महाअष्टमी असणार आहे. या दिवशी महागौरीची पूजा-आराधना केली जाते. यंदा महाअष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे कारण, या दिवशी महानवमीचाही संयोग निर्माण होत आहे. तसेच या दिवशी सिद्धि योग, रवि योग आणि बुधादित्य राजयोगही निर्माण होणार आहेत. महाअष्टमीच्या दिवशी हे शुभ संयोग जवळपास ५० वर्षांनंतर निर्माण होत आहे. त्यामुळे महाअष्टमीचा दिवशी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी महाअष्टमीचा दिवस खूप सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महाअष्टमीचा दिवस अत्यंत लाभदायी असेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल.
हेही वाचा: पुढचे १७३ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार पद, प्रेम आणि पैसा
कन्या
महाअष्टमीचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रत्येक क्षेत्रात प्रगती देणारा असेल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ खूप आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. मेहनतीचे गोड फळ मिळेल. आरोग्यही चांगले राहील. प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)