Mercury Transit 2023 Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानले जाते. बुध हा धन, व्यापार व बुद्धीचा कारक मानला जातो. याशिवाय ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार यंदा म्हणजेच हिंदू नववर्षात बुध ग्रहाकडे मंत्रिपद सोपवण्यात आले आहे. बुद्धिदाता बुध ग्रह २७ मार्चला अस्त झाले आहेत तर ३१ मार्च पासून बुध ग्रह १५ ते १६ अंश वक्री होऊन भ्रमण करणार आहेत. या स्थितीत बुध ग्रह तब्बल ५० वर्षांनी आले आहेत. बुधाचे पाऊल हे सुवर्णयोग घेऊन येणारे आहे. या राजयोगाने काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ व प्रगतीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. चला तर मग पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांच्या नशिबाला नेमके कसे वरदान लाभणार आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुध ग्रह सोनपावलांनी ‘या’ राशींना देणार बक्कळ पैसे?

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या मंडळींना या राजयोगाचा प्रचंड लाभ होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः तुमच्या व्यवसायात वृद्धी होऊन भरपूर पैसे मिळण्याचे योग जुळत आहेत.तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी प्रचंड सकारात्मक वातावरण अनुभवता येऊ शकते ज्यातूनच तुमच्या कामाला वेग मिळू शकतो. कौतूकासह पगारवाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे.

कन्या रास (Virgo Zodiac)

बुध ग्रहाचा राजयोग कन्‍या राशीच्या मंडळींना सुवर्ण काळ अनुभवण्याची संधी देऊ शकतो. नोकरी व व्यवसाय दोन्ही ठिकाणी अमाप लाभाचे योग आहेत. तुमच्या कौटुंबिक सुखाला चारच चांद लागू शकतात. विवाहित मंडळींना पती- पत्नीच्या रुपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. सोने खरेदीसाठी शुभ काळ आहे.

हे ही वाचा<< ‘या’ राशी एप्रिल महिन्यात ठरतील लकी? गुरु- सूर्य- शुक्र गोचराने प्रचंड धनलाभ होऊन अनुभवू शकता अच्छे दिन

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या मंडळींना प्रवासाचे योग आहेत. लहान भावंडांची जबाबदारी उचलावी लागू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी मन जपून काम करावे लागेल. कौटुंबिक प्रेमाने मन शांत राहण्यास मदत होऊ शकते. येत्या काळात तुमची मनःस्थिती आनंदी असल्याने मोठी कामे मार्गी लागू शकतात ज्यातून धनलाभाचे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)