Raksha Bandhan 2023 Shubh Muhurta: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी गोचर करून आपले स्थान बदलत असतो. त्या भ्रमण कक्षेत काही वेळा अन्य ग्रह सुद्धा समोरासमोर येतात आणि या युतीमधून काही राजयोग जुळून येत असतात. आजच्या पवित्र दिनी सुद्धा असे तब्बल पाच मोठे राजयोग जुळून येत आहेत. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच शनिदेव वक्री मार्गात अत्यंत शक्तिशाली झाले होते आणि आज त्यांची नारळी पौर्णिमेच्या चंद्रासह युती होणार आहे. या एकूण संयोगाने बुधादित्य, गजकेसरी, शश, भ्रातवृद्धी व वासरपती असे पाच महत्त्वाचे राजयोग रक्षाबंधनाला जुळून आले आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार हे राजयोग एकत्र अशा पद्धतीने तब्ब्ल ७०० वर्षांनी जुळून आले आहेत. या राजयोगाच्या प्रभावाने तीन राशींच्या भावंडांना शनीदेव शारीरिक, मानसिक व आर्थिक बाजूने भक्कम करून लाभ मिळवून देणार आहेत. या तीन राशी कोणत्या हे पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रक्षाबंधनापासून ‘या’ भावंडांचे अच्छे दिन होणार सुरु?

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

रक्षाबंधनाला जुळून आलेले पाच महायोग हे वृषभ राशीसाठी अत्यंत अनुकूल असणार आहेत. या काळात आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभेल व अचानक- अनपेक्षित धनाची प्राप्ती होऊ शकते. अविवाहित मंडळींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच विवाहित मंडळींसाठी प्रेम व गोडवा वाढवणारा हा कालावधी ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या रूपात आपली परीक्षा होऊ शकते ज्यात तुम्ही घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय खूप सुख व प्रचंड धनलाभ घेऊन येऊ शकतो. एखाद्या छोट्या प्रवासाचे सुद्धा संकेत कुंडलीत आहेत.

मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)

शश महापुरुष राजयोग हा आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानी तयार होत आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला वाहन किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीची संधी मिळू शकते. तुम्हाला जुन्या इन्व्हेस्टमेंट्समधून सुद्धा मोठा धनलाभ होऊ शकतो. धन राजयोग बनल्याने तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग घडण्याची चिन्हे आहेत ज्यातून तुमच्या भाग्यात तिहेरी लाभाची स्थिती तयार होऊ शकते. पुढील दोन महिने तुमचे ग्रहबल अत्यंत मजबूत असल्याने तुम्हाला स्वप्नपूर्तीच्या संधी मिळू शकतात. आईच्या व वडिलांच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. विनाकारण तुमच्याशी गोड वागणाऱ्यांपासून तसेच विनाकारण वाद घालणाऱ्यांपासून सुद्धा सावध रहा.

हे ही वाचा<< रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा देताना Whatsapp Status,फेसबुकला HD Image शेअर करत भावंडांना खळखळून हसवा

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

मुळातच कुंभ ही शनीच्या स्वामित्वाची रास मानली जाते. अशातच शनीदेव स्वतः कुंभ राशीत असल्याने तुम्हाला लाभदायक काळ अनुभवता येऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वाला व विशेषतः स्वभावाला झळाळी मिळू शकते. तुमच्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहील अशा प्रकारची एखादी घटना लवकरच घडू शकते. तुम्हाला पार्टनरची मजबूत साथ लाभू शकते ज्यामुळेतुम्ही एखादी नवी गुंतवणूक किंवा तत्सम खरेदी करू शकता. यामुळे पुढील वर्षभरात आपल्याला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाला प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत तसेच या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते यामुळे तुमचे समाजातील स्थान सुद्धा भक्कम होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 700 years on raksha bandhan shani maharaj makes five major rajyog these lucky rashi brother sister get more money svs