Sun And Mangal Conjunction : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीत राशी बदलतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि मंगळ या दोन ग्रहांची युती होणार आहे. ही युती १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कारण या दिवशी सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करतील तर मंगळ देव आधीच त्या राशीत स्थित आहेत. त्यामुळे या युतीचा परिणाम सर्व राशींवर दिसेल. पण यातील ३ राशी अशा आहेत, ज्यांचे नशीब या काळात उजळू शकते. त्यांना प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. तर त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तूळ रास

सूर्य आणि मंगळाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या धन स्थानी तयार होणार आहे. यामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक राहिल्यामुळे अनेक लोक तुमच्याशी जोडले जाऊ शकतात. व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात. या काळात तुमची बचतही चांगली होऊ शकते. तसेच आरोग्यही चांगले राहण्याची शक्यता आहे.

कर्क रास

सूर्य आणि मंगळाची युती कर्क राशीसाठी अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या पाचव्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. प्रेमसंबंधातही यश मिळू शकते. तसेच या कालात विद्यार्थ्यांना चांगला लाभ होऊ शकतो. शिवाय तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो.

हेही वाचा- दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु? बुध उदय होताच भरमसाठ पैसा आणि संपत्ती मिळण्याची शक्यता

वृषभ रास

मंगळ आणि सूर्याची युती वृषभ राशीसाठी अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या सातव्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. याशिवाय तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. या काळात भागीदारीच्या कामातून लाभ होऊ शकतो. तर व्यावसायिकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)