Jupiter Retrograde 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. नवग्रहामध्ये गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. जवळपास १३ महिन्यानंतर गुरू एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच तो वेळोवेळी मार्गी आणि वक्रीदेखील होतो. यावर्षी ३१ ऑक्टोबर रोजी गुरू वक्री अवस्थेमध्ये संचरण करेल. गुरूची ही वक्री अवस्था दिवाळीच्या काळात होणार असून हा काळ काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे.

कर्क

गुरूच्या वक्री अवस्थेमुळे कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गुरूच्या वक्री अवस्थेमुळे अनेक फायदे होतील. या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.

हेही वाचा: १५ नोव्हेंबरपर्यंत शनि देणार पैसाच पैसा! शश राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार धन-संपत्तीचे सुख

कन्या

गुरू ग्रहाच्या वक्री अवस्थेचा कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात अचानक धनलाभ होतील, अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)