Mercury-Venus Conjunction In 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे निश्चित कालावधीनंतर राशीपरिवर्तन होते. बऱ्याचदा ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे दोन ग्रहांची एकाच राशीत युती निर्माण होते, ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. जानेवारी महिन्यात तब्बल १२ वर्षानंतर शुक्र आणि बुध ग्रहाची मीन राशीमध्ये युती निर्माण होणार आहे, ज्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल. हा योग खूप शुभ मानला जातो. या योगाचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुध-शुक्र चमकवणार तीन राशींचे भाग्य (Mercury-Venus Conjunction)

मिथुन

बुध आणि शुक्र ग्रहाची युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावीत होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही बुध आणि शुक्र ग्रहाची युती सकारात्मक परिणाम देणारी ठरेल. या काळात तुमचे व्यक्तित्व सुधारेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. बौद्धिक क्षमता वाढेल. व्यवसायात यश मिळेल.

हेही वाचा: २२ डिसेंबरपासून नुसता पैसाच पैसा; शुक्राच्या धनिष्ठा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनाही बुध आणि शुक्राची युती खूप शुभ परिणाम देईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील. आकस्मिक धनलाभ होईल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. समजात लोकप्रियता वाढेल. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. कुटुंबीयांची साथ मिळेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After almost 12 years lakshmi narayan yoga will be created in pisces these three zodiac signs will be happy sap