Shani and Surya created samsaptak yoga: ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. त्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर होतो. सध्या सूर्य ग्रह सिंह राशीत विराजमान असून, शनी आपली स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. सूर्य कुंभ राशीतील शनीपासून १८० डिग्री दूर स्थित आहे. त्यामुळे या दोघांमध्ये समसप्तक योग निर्माण होत आहे. त्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर अधिक पाहायला मिळेल. या राशींचे या काळात भाग्य चमकेल.
सूर्य-शनी करणार तीन राशींना मालामाल (Shani and Surya yog 2024)
मेष
समसप्तक योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नव्या नोकरीची संधी मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी पार पाडावी लागेल. वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळेल. प्रवास घडतील आणि आरोग्यही चांगले राहील. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.
मिथुन
समसप्तक योग मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होतील. धार्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. नवीन छंद आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. या काळात घरामध्ये शुभकार्ये पार पडतील. मिथुन राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
हेही वाचा: पैसाच पैसा! मंगळ-चंद्राची युती निर्माण करणार ‘महालक्ष्मी योग’; ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा
कुंभ
समसप्तक योग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येतील. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन गाडी, मोबाईल विकत घेऊ शकता. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.
(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd