Trigrahi Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह अडीच वर्षांनी राशी बदलतो. नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात मंद चाल असलेला ग्रह आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व आहे. शनिदेव आपल्या कुंभ राशीत विराजमान आहेत, तर या फेब्रुवारी महिन्यात शुक्रदेव आणि बुधदेवही कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे शनिच्या कुंभ राशीत शनि, बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. हा त्रिग्रही योग सर्व राशींवर प्रभाव टाकेल. पण काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी… 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस?

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. या लोकांना नोकरीत मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. २०२४ हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगलं सिद्ध होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमचं आरोग्यही चांगलं राहण्याची शक्यता आहे. 

(हे ही वाचा : Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. भाग्याची या लोकांना साथ लाभू शकते. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या चांगल्या पॅकेजसह इतर कंपनीकडून कॉल येण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कौटुंबिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी राहण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

त्रिग्रही योग कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या काळात आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख मिळू शकतं. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After fifty years trigrahi yog in kumbh rashi these three zodiac signs to earn wealth money pdb