Surya-Mangal-Budh Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे वेळोवेळो राशी परिवर्तन होत असते. सर्वच ग्रह हे कमी अधिक प्रमाणात १२ राशींच्या भविष्यात उलाढाली घडवून आणत असतात. जानेवारी महिन्यात सुद्धा काही ग्रह आपली जागा बदलणार आहेत. यामुळे काही शुभ- अशुभ राजयोग सुद्धा तयार होत आहेत. जानेवारी महिन्यात सर्वात महत्त्वाचे योग जसे की, त्रिंगही, लक्ष्मी नारायण राजयोग हे धनु राशीतच तयार होत आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार असा योगायोग सुद्धा तब्बल पाच वर्षांनी जुळून आला आहे. जेव्हा अशा प्रकारे तीन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्यातून त्रिंगही योग तयार होतो, या ग्रहांमध्ये जर मैत्रीपूर्ण नाते असेल तर प्रभावित राशींना सुद्धा सकारात्मक बदल जाणवतात तर याउलट शत्रुत्वाचे नाते असल्यास राशींना सुद्धा कष्ट सहन करावे लागू शकतात. सध्या तीन ग्रहांची युती ही धनु राशीत असली तरी याचा प्रचंड मोठा फायदा हा अन्य तीन राशींना होणार आहे. अगदी म्हणतात ना चहूबाजूंनी धनाची वर्षा या राशींवर होणार आहे. या तीन नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच वर्षांनी ‘या’ राशींच्या नशिबाला लागलेले टाळे उघडणार

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या मंडळींना त्रिंगही राजयोगाचा विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. या राशीसाठी योग शुभ असणार आहे. धनु राशीत तयार झालेली ग्रह युती मेष राशीच्या मंडळींना नशिबाची तगडी साथ मिळवून देईल. या कालावधीत अडकून पडलेली कामे सहज मार्गी लागतील. अडथळे दूर झाल्याने मन व डोक्यावर ताण सुद्धा बाजूला होईल. हात घालावा त्या प्रत्येक कामात यश तुमच्या वाट्याला येणार आहे. विशेषतः नोकरदार मंडळींना तर नवनवीन संधी दिसून येतील. भविष्यासाठी काही योजना आखू शकता. गुंतवणुकीवर भर देणे कधीही हिताचेच ठरेल. करिअरमध्ये स्थैर्य अनुभवता येईल. परदेशवारीचे योग आहेत.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीत प्रथमच स्थानी त्रिंगही राजयोग निर्माण होत असल्याने या राशीचे लोक सुद्धा अत्यंत शुभ काळ अनुभवातील. या कालावधीत आपल्याला प्रसन्नता अनुभवता येईल. आपल्या राशीत सूर्याच्या अस्तित्वामुळे साहस व पराक्रमाची वाढ होईल. आपला आत्मविश्वास वाढल्याने अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकता. भौतिक सुखाची सुरवात होईल. कुटुंबासह नाते सुधारण्याची चिन्हे आहेत. नोकरीसाठी सुरु असलेली धडपड शुभ परिणामांसह थांबेल. नफ्याची गणिते जुळून येतील. एकूणच तुमच्या राशीची आर्थिक बाजू फारच भक्कम होऊ शकते.

हे ही वाचा<< मार्गशीर्ष गुरुवारी अद्भुत योग; हस्त नक्षत्रात कलाष्टमी तिथीवर तुमच्या राशीचे भाग्य कसे बदलणार? मेष ते मीनचे राशिभविष्य

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीसाठी शास्त्रानुसार हा योग शुभ असणार आहे. या कालावधीत तुमच्या मूळ व काही सुप्त इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत. आर्थिक स्थिती बळकट झाल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. समाजातील आपले स्थान व मान- सन्मान वाढेल. आत्मविश्वासाने काम करू शकणार आहात. परदेश स्थित व्यवसायात आपली गुंतवणूक असल्यास प्रचंड फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. भावंडांच्या रूपात प्रचंड धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After five years mahashubh yog made in dhanu rashi with trigahi rajyog these three zodiac signs to earn wealth money astrology svs