Navpancham Rajyog: ग्रहांचा सेनापती मंगळ निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. लवकरच मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे मंगळाची गुरुसह युती होणार आहे. यानंतर २२ जुलैला चंद्राचा वृषभ राशीत प्रवेश होईल ज्यामुळे चंद्र, मंगळ, गुरुच्या एकत्रित प्रभावाने नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह नवव्या व पाचव्या स्थानी भ्रमण करत असतात तेव्हा नवपंचम योगाची निर्मिती होते.

विक्रम संवत्सर दिनदर्शिकेनुसार २२ जुलैला ‘सावन’ मासातील पहिला सोमवार असणार आहे. त्यामुळे या राजयोगाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. (लक्षात घ्या मराठी पंचांगानुसार श्रावण महिना ५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे). चंद्र २२ जुलै पासून अडीच दिवस वृषभ राशीत स्थित असतील ज्यामुळे नवपंचम योग अडीच दिवस सर्वात शक्तिशाली असेल. या अडीच दिवसात कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होऊ शकतो हे पाहूया..

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

नवपंचम राजयोग बनल्याने अडीच दिवस ‘या’ राशींची होणार चांदी

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

चंद्राच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत नवपंचम राजयोगाचा प्रभाव असणार आहे त्यामुळे या राशीच्या मंडळींना विशेष लाभ होऊ शकतात. अडकून पडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात चालू असलेले वाद दूर होऊ शकतात. सरकारी नोकरीची संधी मिळू शकते. वरिष्ठांची मर्जी राखाल. आपल्याला जोडलेल्या नात्यांमधून लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. आपल्या व्यक्तिमत्वाला आत्मविश्वास व साहसाची जोड लाभू शकते. भागीदारीत केलेला व्यवसाय प्रचंड मोठा आर्थिक लाभ देऊन जाईल. काही निर्णय सतर्क राहून घ्यावे लागतील.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी तयार होणारा नवपंचम राजयोग हा मकर राशीसाठी लाभदायक आहे. नोकरीत प्रगतीचे व पगारवाढीचे योग आहेत. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना लवकरच उत्तम संधी प्राप्त होऊ शकते. आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत लाभतील. आपले लक्ष्य प्राप्त करण्याच्या दिशेने काही पाऊले पुढे जाऊ शकाल. वयस्कर मंडळींना आपल्या माध्यमातून मदत होऊ शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. वाद संपुष्टात येतील.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण योग पुढील २३ दिवस ‘या’ ५ राशींना देईल प्रचंड धन-दौलत; नशिबात राजासारखं जीवन जगण्याची संधी

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

वृश्चिक राशीसाठी मंगळ व चंद्राचा नवपंचम योग हा फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कुटुंब व प्रियजनांसह चांगला वेळ घालवाल. कामाच्या अडचणी दूर होतील. बेरोजगारांना नोकरीच्या उत्तम संधी लाभू शकतात. वाडवडिलांच्या संपत्तीचा वाटा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. एखाद्या गोष्टीची नवी सुरुवात करण्याची संधी जर मिळत असेल तर मागे होऊ नका. मित्रांसह वेळ घालवल्याने मानसिक तणाव सुरू होऊ शकतो. प्रेम संबंध खुलून येतील.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)