ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा म्हणवला जाणारा सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तूळ राशीमध्ये सूर्य दुर्बल मानला जात असला तरीही या काळात सूर्यदेवांमुळे तीन राशींच्या लोकांना अनेक लाभ लोण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- सिंह
सूर्यदेव सिंह राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करत असल्याने या राशींच्या लोकांना व्यापार आणि करिअरमध्ये यश मिळण्याची संभावना आहे. तसेच, या काळात नोकरदार आपले लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी ठरू शकतात. यावेळी या लोकांना त्यांच्या लहान भावंडांचे सहकार्य मिळू शकते. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य देव असल्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण या राशीसाठी फायदेशीर ठरू शकते.
- मेष
मेष राशीच्या सप्तम भावात सूर्याचे संक्रमण होणार आहे. याला वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान म्हणतात. या दरम्यान या राशीच्या लोकांचा आपल्या जोडीदारासह चांगला ताळमेळ बसू शकतो. तसेच, या दिवसांमध्ये भागीदारीतील कामांमध्ये यश मिळण्याची संभावना आहे. या काळात सुरु केलेले नवे काम भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. मेष राशीतील सूर्य ग्रह उच्च राशीचा मानला जातो. त्यामुळे हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
- कर्क
सूर्य देवाचे राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. याचं कारण म्हणजे कर्क राशीच्या चौथ्या घरात सूर्य प्रवेश करणार आहे. हे भौतिक सुखाचे स्थान मानले जाते. यामुळे या राशींच्या लोकांना या काळात भौतिक सुख मिळू शकते. तसेच, यावेळी घर-प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी केली जाऊ शकते. त्याच वेळी, या राशीचा स्वामी चंद्रदेव आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेव आणि चंद्र ग्रह यांच्यामध्ये मैत्रीची भावना असल्याने सूर्यदेवाच्या संक्रमणामुळे या लोकांची सर्व रखडलेली कामे मार्गी लागू शकतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)