Mangal Vakri In Mithun 2022: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. जर एखाद्याच्या कुंडलीत मंगळ बलवत्तर असेल तर अशा व्यक्ती साहसी व कर्तृत्ववान असतात असे मानले जाते. तर मंगळ ग्रहाची साथ नसल्यास वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याचेही समज आहेत. आज ३० ऑक्टोबर पासून मंगळ ग्रह हा मिथुन राशीत चक्री होणार आहे. पंचांगानुसार दिवाळीच्या मुहूर्तावर शनिदेव गोचर करून मिथुन राशीत विराजमान झाले होते आता त्यापाठोपाठ मंगळही याच राशीतून वक्री होणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनि व मंगळ हे दोन्ही ग्रह अत्यंत शक्तिशाली मानले जातात त्यामुळे त्यांचा प्रभाव हा केवळ मिथुनच राशीच नव्हे तर अन्यही राशींमध्ये दिसून येणार आहे. त्यातही चार अशा राशी आहेत ज्यांना शनि व मंगळाचे संक्रमण अत्यंत लाभदायी ठरू शकते. धनलाभाचे प्रबळ योग असणाऱ्या या तीन राशी कोणत्या जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रह वक्री होणे हे अत्यंत शुभ ठरू शकते. मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने निर्णय क्षमता सुधारून आपण स्वतःच्या हितासाठी अनेक मोठी पाऊले उचलू शकता. आपल्या वैवाहिक व व्यावसायिक दोन्ही पार्टनरशिप या मजबूत होण्यासाठी मंगळ लाभदायी ठरू शकतो. जर तुमचा व्यवसाय असेल तर धनलाभाचे प्रबळ योग आहेत. मंगळ ग्रह सिंह राशीच्या प्रभाव कक्षेत ११ व्या स्थानी विराजमान होणार आहे त्यामुळे आपल्याला अनपेक्षित धन- संपत्ती लाभू शकते.

मीन

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, मीन राशीसाठी मंगळ वक्री लाभदायी ठरू शकते. मुख्यतः करिअरमध्ये प्रगती होण्याची चिन्हे आहेत. मंगळ ग्रह वक्री होऊन आपल्या राशीत चतुर्थ स्थानी विराजमान होणार आहे. हे स्थान मातृ स्थान म्हणून ओळखले जाते, बहुतेक सुखाची प्राप्ती करून देणारे हे स्थान आहे असे मानतात. मातृ स्थानी मंगळ विराजमान असल्याने तुम्हाला संतती प्राप्तीचे योग आहेत. जर आपण नवे वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित असाल तरी पुढील एक महिना हा शुभ काळ ठरू शकतो.

वृषभ

मंगळ ग्रह वृषभ राशीच्या प्रभाव कक्षेत दुसऱ्या स्थानी असणार आहे. व्यवसाय वृद्धीसाठी हे स्थान अत्यंत शुभ मानले जाते. तसेच शैक्षणिक प्रगतीचे योग आणखी शक्तिशाली होण्यासाठी हे स्थान लाभदायी ठरू शकते. शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात प्रगतीमुळे आपल्याला धनलाभाचे अनेक स्रोत खुले होऊ शकतात.

यंदा तुळशीचं लग्न कधी? कार्तिकी एकादशीची तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)