Guru Margi Mesh Lucky Zodiac Signs For 2024: देवतांचे गुरु बृहस्पती येत्या काही दिवसात मेष राशीत मार्गी होणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार या वर्षात एप्रिल महिन्यात गुरु देव हे मेष राशीत विराजमान झाले होते. गुरु ग्रहाला ग्रहमालेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आता येत्या डिसेंबर महिन्यात म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ ला सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी गुरुदेव मार्गी होणार आहेत. एखादा ग्रह मार्गी होणे म्हणजे त्याने १८० अंशात सरळ रेषेत पुढे जाणे. १८० अंशातील प्रवास का प्रभावित राशीवर थेट परिणाम करणारा असू शकतो त्यामुळे गुरु मार्गी होताच काही राशींची अनेक अडकून पडलेली कामे सुद्धा मार्गी लागू शकतात. गुरु मार्गी असण्याचा प्रभाव हा पुढील काही महिने कायम असणार आहे परिणामी २०२४ मध्ये या प्रभावित राशींना अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. प्रगतीचा वेग प्रत्यक्ष वाढल्याने होणारा आर्थिक लाभ सुद्धा वाढू शकतो ज्यामुळे येत्या वर्षात या राशींना करोडपती होण्याची सुद्धा संधी मिळू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा