Malavya Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून राजयोग निर्माण करतात. ३० नोव्हेंबर रोजी धन आणि वैभवाचा दाता शुक्र आपल्या मूळ त्रिकोणी राशी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींवर शुक्रदेवाची विशेष कडपा राहू शकते. तसेच, या लोकांच्या संपत्तीतही अमाप वाढ होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मकर रास (Makar Zodiac)
मालव्य राजयोगाची निर्मिती मकर राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून कर्माच्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचीनोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. याशिवाय तुमच्या आयुष्यात पैसे कमावण्याच्या अनेक संधी येऊ शकतात. मकर राशीचे लोक पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकतील. जर तुम्ही फिल्म लाइन, मीडिया, फॅशन डिझायनिंग, मॉडेलिंग आणि कला या क्षेत्राशी संबंधित असाल तर या काळात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
तूळ रास (Tula Zodiac)
मालव्य राजयोगाची निर्मिती तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच शुक्र ग्रह तुमच्या राशीमध्येच भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्वात सुधारना होऊ शकते. तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तुम्हाला कुटुंबीयांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
हेही वाचा- गुरुदेवाच्या गोचरामुळे ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा? २०२४ सुरु होण्याआधीच होऊ शकता प्रचंड श्रीमंत
मेष रास (Aries Zodiac)
मालव्य पंचमहापुरुष राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. हा राजयोग तुमच्या राशीच्या सातव्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. अविवाहितांना नवीन वर्षात विवाह होण्याची शक्यता आहे. शुक्र तुमच्या राशीच्या धन स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)