- मेष:-
मुलांच्या आनंदाने भारावून जाल. रेस, सट्टा यांतून फायदा संभवतो. करमणुकीचे खेळ खेळाल. दिवस मौजमजेचा असेल. छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळेल. - वृषभ:-
घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल. बागबगीच्याची कामे कराल. जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे. किरकोळ दुखापत संभवते. कामाचा उरक वाढेल. - मिथुन:-
जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. मुलांना आपल्या देखरेखीखाली घ्यावे. मैदानी खेळात रमाल. तुमच्यातील चपळाई वापरावी लागेल. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. - कर्क:-
गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. शेतीतील कामातून फायदा होईल. सतत कामात गुंतून राहाल. घरातील वातावरण शांततेचे ठेवावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. - सिंह:-
इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. सर्वांशी आपुलकीने वागाल. हातापयास किरकोळ इजा होऊ शकते. महत्त्वाच्या कामांना वेगळा वेळ काढावा. - कन्या:-
मानसिक स्थैर्य जपावे. कामांची वेळेनुसार विभागणी करावी. चौकसपणे विचार करावा. फक्त तर्क करून चालणार नाही. बोलतांना सावधगिरीने बोलावे. - तूळ:-
सर्वांशी लाघवीपणे बोलावे. अनावश्यक खर्च टाळावा. व्यावसायिक ज्ञान वाढवावे लागेल. बुद्धीच्या जोरावर कामे कराल. अत्यंत व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. - वृश्चिक:-
स्मरणशक्तीचा योग्य वापर करावा. तुमच्यातील समजुतदारपणा दिसून येईल. कामे चोख बजावाल. काही वेळेस चातुर्याने वागावे लागेल. कौतुकास पात्र व्हाल. - धनु:-
कामात कसलीही कसूर करून चालणार नाही. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. प्रवासाची आवड पूर्ण कराल. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. - मकर:-
वेळेनुसार काही बदल करावेत. परिस्थितीवर मात करावी. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. भौतिक गोष्टींत गुंतून पडाल. वडीलधाऱ्यांशी मतभेद संभवतात. - कुंभ:-
स्वतःच्या बळावर कामे कराल. प्रवासात काळजी घ्यावी. यांत्रिक उद्योगात प्रगती होईल. पत्नीच्या सल्ल्याने वागाल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. - मीन:-
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मूत्राशयाचे विकार त्रास देऊ शकतात. शारीरिक कष्ट वाढू शकतात. हातातील कामात चिकाटी ठेवावी. निराश होण्याचे कारण नाही.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १७ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 17-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aily horoscope astrology in marathi tuesday 17 december 2019 aau