• मेष:-
    मुलांच्या आनंदाने भारावून जाल. रेस, सट्टा यांतून फायदा संभवतो. करमणुकीचे खेळ खेळाल. दिवस मौजमजेचा असेल. छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळेल.
  • वृषभ:-
    घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल. बागबगीच्याची कामे कराल. जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे. किरकोळ दुखापत संभवते. कामाचा उरक वाढेल.
  • मिथुन:-
    जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. मुलांना आपल्या देखरेखीखाली घ्यावे. मैदानी खेळात रमाल. तुमच्यातील चपळाई वापरावी लागेल. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे.
  • कर्क:-
    गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. शेतीतील कामातून फायदा होईल. सतत कामात गुंतून राहाल. घरातील वातावरण शांततेचे ठेवावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी.
  • सिंह:-
    इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. सर्वांशी आपुलकीने वागाल. हातापयास किरकोळ इजा होऊ शकते. महत्त्वाच्या कामांना वेगळा वेळ काढावा.
  • कन्या:-
    मानसिक स्थैर्य जपावे. कामांची वेळेनुसार विभागणी करावी. चौकसपणे विचार करावा. फक्त तर्क करून चालणार नाही. बोलतांना सावधगिरीने बोलावे.
  • तूळ:-
    सर्वांशी लाघवीपणे बोलावे. अनावश्यक खर्च टाळावा. व्यावसायिक ज्ञान वाढवावे लागेल. बुद्धीच्या जोरावर कामे कराल. अत्यंत व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल.
  • वृश्चिक:-
    स्मरणशक्तीचा योग्य वापर करावा. तुमच्यातील समजुतदारपणा दिसून येईल. कामे चोख बजावाल. काही वेळेस चातुर्याने वागावे लागेल. कौतुकास पात्र व्हाल.
  • धनु:-
    कामात कसलीही कसूर करून चालणार नाही. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. प्रवासाची आवड पूर्ण कराल. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.
  • मकर:-
    वेळेनुसार काही बदल करावेत. परिस्थितीवर मात करावी. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. भौतिक गोष्टींत गुंतून पडाल. वडीलधाऱ्यांशी मतभेद संभवतात.
  • कुंभ:-
    स्वतःच्या बळावर कामे कराल. प्रवासात काळजी घ्यावी. यांत्रिक उद्योगात प्रगती होईल. पत्नीच्या सल्ल्याने वागाल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल.
  • मीन:-
    मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मूत्राशयाचे विकार त्रास देऊ शकतात. शारीरिक कष्ट वाढू शकतात. हातातील कामात चिकाटी ठेवावी. निराश होण्याचे कारण नाही.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aily horoscope astrology in marathi tuesday 17 december 2019 aau
Show comments