Ajit Pawar Astrology Prediction: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली होती. एकूणच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची काहीशी पीछेहाट झाल्यासारखी स्थिती होती. त्यातच अजित पवार भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर अशा बातम्याही अधुनमधून येत होत्या. शरद पवार यांच्या त्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे राज्यापासून ते थेट दिल्लीपर्यंत सर्वांनाच बुचकळ्यात टाकल्यासारखी स्थिती होती, तरी राष्ट्रवादीकडे सर्वांचेच लक्ष खेचण्यामध्ये पवार यांना यश आले होते. त्यानंतरचा काळ पुढची धुरा कुणाकडे या चर्चेमध्ये गेला. आता कालच अजित पवार यांनी पक्षकार्याचा मुद्दा परत एकदा पुढे केल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या रास व कुंडलीवर आधारित हा एक भविष्याचा आढावा…
अजित पवारांना सध्या साडेसाती सुरू असून, चंद्रा वरुन होणारे शनी भ्रमण मंगळ व प्लुटोच्या प्रतीयोगातून होत असल्याने, त्यांना वाढत्या अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत आहे. सत्तेचा कारक रवी हा मूळ कुंडलीत राहूच्या केंद्रात असल्याने, एक संभ्रमाचे वातावरण सातत्याने तयार होत असते. घेतलेल्या निर्णयात भावनिकता अधिक दिसून येते. मकर राशीत असलेल्या प्लुटोमुळे सत्तेचा कारक रवी पूर्ण बाधीत झाला आहे. मेष राशीत असलेला हर्षल हा अजित पवारांच्या मूळ कुंडलीतील गुरु-बुध यांच्या अशुभयोगातून जात असल्याने, जे ठरवले आहे, त्याप्रमाणे घडून येत नाही, तथापि, पक्षातील वाढती खदखद त्यांना थोपवू शकत नसल्याचेही दिसून येत आहेत.
दरम्यान, या वर्षाच्या म्हणजे २०२३ च्या शेवटापासून ग्रह त्यांना अनुकूलतेचे दान टाकण्यास सुरुवात करतील. दिनांक २४ एप्रिल २०२४ ला मात्र पापग्रहांना पूर्ण छेद देऊन, सत्तेचा कारक रवी एका काटेरी सिंहासनावर विराजमान होईल.
हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांची महत्त्वाची भविष्यवाणी
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार व अजित पवार हे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. सध्या पक्षाची वाटचाल अत्यंत नाजूक झाली आहे. कुंभ राशीतील शनी भ्रमण, मेष राशीतील राहू भ्रमण, मकर राशीतील प्लुटो चे भ्रमण हे पक्षापुढे असंख्य अडचणी वाढवू शकते. या पाप ग्रहांचा अडथळा पक्षाला अगोदर पार करावा लागणार आहे. तरीही, पक्षातील फूट रोखण्यात नेतृत्वाला अपयश येईल अशी शक्यता दिसते आहे. दरम्यान, मीन राशीतील शनी पासून पक्षाची पुढील वाटचाल पाहणे खूपच औत्सुक्याचे असेल.