Ajit Pawar & Sharad Pawar Astrology: प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ उदयराज साने यांनी आठवड्यापूर्वीच अजित पवार व शरद पवार यांच्या कुंडलीतील ग्रहमानावरून काही संकेत समोर येत असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष पार्ट ३ मध्ये यातील अनेक भविष्यवाण्या खऱ्या होताना दिसत आहेत. अजित पवार व शरद पवार यांच्याविषयी ज्योतिषतज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं होतं जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांची कुंडली काय सांगते? (Ajit Pawar Kundli)

अजित पवारांना सध्या साडेसाती सुरू असून, चंद्रा वरुन होणारे शनी भ्रमण मंगळ व प्लुटोच्या प्रतीयोगातून होत असल्याने, त्यांना वाढत्या अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत आहे. सत्तेचा कारक रवी हा मूळ कुंडलीत राहूच्या केंद्रात असल्याने, एक संभ्रमाचे वातावरण सातत्याने तयार होत असते. घेतलेल्या निर्णयात भावनिकता अधिक दिसून येते. मकर राशीत असलेल्या प्लुटोमुळे सत्तेचा कारक रवी पूर्ण बाधीत झाला आहे. मेष राशीत असलेला हर्षल हा अजित पवारांच्या मूळ कुंडलीतील गुरु-बुध यांच्या अशुभयोगातून जात असल्याने, जे ठरवले आहे, त्याप्रमाणे घडून येत नाही, तथापि, पक्षातील वाढती खदखद त्यांना थोपवू शकत नसल्याचेही दिसून येत आहेत.

शरद पवार यांची कुंडली काय सांगते? (Sharad Pawar Kundli)

शरद पवार यांच्या मूळ कुंडलीत राहू षडाष्टक गुरु व राहू षडाष्टक शनी असल्याने, त्यांच्या गुप्त शत्रूंमध्ये प्रचंड वाढ प्रथमपासूनच होती आणि या शत्रूंकडून वारंवार शह देण्याचा अयशस्वी प्रयत्न झालेला असला, तरी त्यात त्यांची स्वतःची ताकद व बुद्धिमत्ता खर्ची पडलेली आहे.सांप्रत गोचर शनि भ्रमण कुंभ राशीतून सुरू असून, गुरु नुकताच मेष राशीत आलेला आहे. याच मेष राशीत राहूचे भ्रमण सुरू आहे. तसेच हर्षलचे भ्रमण मेष राशीतूनच, सुरू असल्याने आणखी बिकट वाट होत जाणार आहे. १० मे रोजी मंगळाचा कर्क राशीत प्रवेश झाला आहे. हा मंगळ प्रथम राहू, त्यानंतर गुरु व शनि यांच्या केंद्रातून जाणार आहे.(त्यांच्या मूळ कुंडलीतून) त्यामुळे हा मंगळ पक्षातील दरी वाढवत जाणारा आहे.

दिनांक १५ जून रोजी रवीने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. ह्या वेळी त्यांच्या मूळ कुंडलीतील रवीला हा मिथुन रवी सहावा राहणार आहे. दिनांक २४ जूनला बुध हा मिथुन राशीत प्रवेश करत असल्याने, आरोग्याची आणखी काळजी करायला लागणार आहे. दिनांक १६ जून रोजी हर्षलने कृत्तिका या राक्षसगणी नक्षत्रात प्रवेश केलेला असल्याने, जून व ३१ जुलै पर्यंतचा संपूर्ण कालखंड अत्यंत तापदायक जाणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष टोकाला जाणार असल्याची सुद्धा चिन्हे आहेत असे उदयराज साने यांनी म्हटले होते. अजित पवारांच्या शपथविधी कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी आता स्वतः मैदानात उतरून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे घोषित केले आहे. येत्या काळात महाराष्ट्रात सत्तेची गणिते आता कशी बदलतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

उदयराज साने

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar rebel was predicted one week before as per sharad pawar kundali astrologer says shani sadesati effect on ncp svs