Sharad Pawar and Ajit Pawar Astrology Predictions Lok Sabha Election 2024: शरद पवार व अजित पवार यांच्या पत्रिकेच्या बाबत एकाच वाक्यात सांगायचं तर दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. अजित पवारांच्या पत्रिकेत षष्टात कुंभ राशीतील शनीचे वास्तव्य खूपच वेदनादायक ठरेल. पत्रिकेत शनी मंगळ समोरासमोर आहेत. कौटुंबिक स्थानात जन्मस्थ शनी असल्याने नातेवाईकांमध्ये नाराजीचा सूर कायम असेल. तर मंगळाच्या प्रभावाने अपेक्षा उंचावलेल्या असतील पण त्यातही कोण शत्रू व कोण मित्र शेवटपर्यंत कळणार नाही. यश अपयश सारख्याच तराजूत असल्याचा भास होत राहील. शनी मंगळाचा समसप्तक योग त्यात बुधामध्ये राहूची अंतर्दशा त्यात शत्रुस्थानी षष्टात साडेसातीचे सावट यामुळे राजकारणात माफक प्रमाणात यश पदरी पडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांच्या हातात एवढंच की..

शरद पवारांच्या पत्रिकेत शनी- मंगळ समोरासमोर त्यात गुरु शनी चांडाळ योग असल्याने राजकारणात उत्तम डावपेच आखल्यास यश मिळवणे ही खासियत सिद्ध होऊ शकते. पण चतुर्थात असलेला गोचर शनी दशम स्थानाकडे सातव्या दृष्टीने पाहात आहे. हवे तसे यश मिळणार नाही पण राजकारणात हार न मानता सतत पुढे लढत राहायचे असते.

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

नरेंद्र मोदी व शरद पवारांची लग्न रास सांगते..

विशेष म्हणजे शरद पवार नरेंद्र मोदी या दोघांचीही लग्न रास वृश्चिक आहे, हे दोघेही राजकारणातील मुरलेले नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत आता गोचराचा शनी त्याच्या चतुर्थ स्थानी आला आहे. एकूण हा एक मोठा कुयोग आहे. दुसरीकडे गोचरीच्या शनीशी पत्रिकेतील मंगळ केंद्रयोग करत आहे. विशेषतः २० एप्रिल २०२४ ते ३० मे २०२५ पर्यंत हा कालावधी मोदींसाठी अतिशय क्लेशदायक ठरेल. मंगळाच्या अंतर्दशेत शनीची अंतर्दशा सचोटी, मेहनत, संयम यांचा कस लागेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar shani got strong causing fights whereas sharad pawar has to try for political success astrology predictions during ncp split svs