Maharashtra Politics: सध्याच्या महाराष्ट्राच्या सत्तास्पर्धेत राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आपले विरोधी पक्षनेतेपद सोडून सत्तेत सामील झाले आहेत. त्यांनाही बहुमानाने उपमुख्यमंत्री पद देऊन राज्य कारभारात सामील करून घेण्यात आले आहे. शिवाय २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून अजित पवार गटासाठीचं खातेवाटप प्रलंबित होतं. शुक्रवारी या खातेवाटपाला मुहूर्त लागला. शिंदे गट व भाजपाकडची काही खाती अजित पवार गटाकडे गेली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असणारं अर्थखातं अजित पवारांकडे गेलं. याच पार्श्वभूमीवर आता ज्योतिषतज्ञ उल्हास गुप्ते यांनी भविष्यात अजित पवार व फडणवीस या दोघांच्या वाट्याला नेमक्या कोणत्या प्रकारच्या वेगळ्या जबाबदाऱ्या येऊ शकतील याविषयी भाकीत केले आहे.
अजित पवारांच्या वाट्याला साडेसाती आणि…
अजितदादा पवार यांना सध्या साडेसातीचा त्रास चालू आहे तसेच गोचर शनिचा वक्री प्रवास कौटुंबिक कलह दाखवत आहे. गोचर शनिचा मंगळ प्लुटोशी होणारा प्रतियोग यातून भावनिक मतभेद होतील. विशेषत: भावंडाच्या बाबतीत तात्पुरती कटूता निर्माण होईल. चतुर्थात गुरु राहू चांडाळ योग व तो दशमातील रवी बुधाशी केंद्रयोग करीत आहे. कामात काहीशा अडचणी निर्माण होतील. सध्या बुध महादशेत राहूची अंतर्दशा अडचणी निर्माण करेल. एकूण सध्या उपमंत्रीपदावर समाधान मानून लोकांची कामे करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे, हेच त्यांच्यासाठी खूप महत्वाचे ठरेल.
हे ही वाचा<< “एकनाथ शिंदे सत्तेत राहतील पण…”, अजित पवारांच्या एंट्रीनंतर ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी
देवेंद्र फडणवीस, गरज लागल्यास राज्यात…
देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपचे महाराष्ट्रातील आघाडीचे नेतृत्व आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत सध्या त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. राज्यकारभारात गरज भासली तर ते अतिमहत्त्वाच्या पदावर नियुक्त होऊन कारभार सुरळीत चालवतील. विशेष करून भाजपला महाराष्ट्रात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. एकनाथ शिंदे यांच्या भविष्यात सत्तेत राहतील पण… आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेतील अतिमहत्त्वाच्या पदावर नियुक्ती या दोन्ही भाकितांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे काळच ठरवेल!
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)