Akhand Samrajya Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय आणि अस्त होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-जगावर होताना दिसतो. यासोबतच उगवत्या ग्रहांमुळे अनेक शुभ योगही बनतात. शनिदेव ९ मार्चला उदय होत अखंड साम्राज्य राजयोग तयार करणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना यावेळी धनलाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मकर राशी

अखंड साम्राज्य योगाची निर्मित मकर राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या घरात उदय होणार आहेत. ज्याला पैसा आणि वाणीचा अर्थ समजला जातो. त्यामुळे यावेळी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. त्याच वेळी, तुमच्या बोलण्याचा प्रभाव दिसून येईल. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल आणि तुमची प्रशासकीय क्षमता वाढेल. तसेच, जे मीडिया, फिल्म लाइन आणि मार्केटिंग कामगार आहेत त्यांच्यासाठी ही वेळ चांगली सिद्ध होईल.

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान

धनु राशी

अखंड साम्राज्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनि ग्रह तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात येईल. यावेळी शनिदेव बलवान असतात. त्यामुळे यावेळी तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होईल. तसेच, या संक्रमणादरम्यान तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. या काळात तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. यासोबतच तुम्हाला भाऊ-बहिणीची साथ मिळेल. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर १७ जानेवारीपासून तुम्हाला साडेसतीपासून मुक्तीही मिळाली आहे.

( हे ही वाचा: १५ मार्चपासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सुर्यदेवाचा प्रवेश मिळवून देणार बक्कळ धनलाभाची संधी)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी अखंड साम्राज्य राजयोग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून नवव्या घरात शनिदेवाचा उदय होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे भाग्य चमकेल. यासोबत आधीपासून अडकलेले काम यावेळी पूर्ण होईल. दुसरीकडे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता असते. तसेच, तुम्ही या काळात नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

Story img Loader