साडेतीन या शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया हा सण यंदा ३ मे २०२२ रोजी आहे. या दिवशी दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्य मिळते असे मानले जाते. तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहता करता येते. या सणाला आखा तीज असेही म्हणतात. अक्षय्य तृतीया असा दिवस आहे की मुहूर्ताचा विचार न करता तुम्ही खरेदी किंवा कोणतेही शुभ कार्य करू शकता कारण संपूर्ण दिवस हा अबूझ मुहूर्त आहे. या दिवशी तुम्ही लग्न कार्य करू शकता, आणि सोने, चांदी, दागिने, घर, वाहन किंवा इतर मालमत्ता खरेदी करू शकता. या वर्षी या तिथीला तीन राजयोगही तयार होत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. जाणून घेऊया खरेदीसाठी शुभ मुहूर्त आणि या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन राजयोग
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुक्र स्वतःच्या राशीत असल्यामुळे मालव्य राजयोग, गुरु बृहस्पति मीन राशीत असल्याने हंस राजयोग आणि शनि स्वतःच्या राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. तर सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीत स्थित असतील. सुमारे ५० वर्षांनंतर असा योगायोग घडत की दोन ग्रह उच्च राशीत असतील आणि दोन प्रमुख ग्रह स्वयंभू राशीत असतील.

अक्षय्य तृतीयेला दानाचे महत्त्व
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेकजण दानही करतात. या दिवशी केलेल्या दानाला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते. यासोबतच आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतात आणि घरात पैसा आणि अन्नाची कमतरता भासत नाही. यासोबतच भगवान विष्णू आणि माँ लक्ष्मीची कृपा राहते.

Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेला ५० वर्षांनंतर येणार ‘हा’ योग, लक्ष्मी कृपा प्राप्तीसाठी चांगला दिवस!

  • जवस दान करा: अक्षय्य तृतीयेला जवस दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. शास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते. त्यामुळे जव दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
  • अन्न दान करा: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला तांदूळ, डाळ आणि पीठ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने शुभ फळ मिळते. यासोबतच माता अन्नपूर्णाची कृपा सदैव राहते.
  • जल दान करा: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जल दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी किंवा लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल. पुराणात असेही लिहिले आहे की, अक्षय्य तृतीयेला जल दान करणे फार मोठे पुण्य मानले जाते. असे केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.