Akshaya Tritiya 2022 Date : हिंदू धर्मात अक्षय तृतीया या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवसाला शुभ तिथी मानले जाते. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, यासह कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी मुहूर्त न काढताही शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तृतीया तिथी मंगळवार, ३ मे २०२२ रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होईल आणि ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहील. या दिवशी रोहिणी नक्षत्र राहील. रोहिणी नक्षत्र ४ मे रोजी सकाळी १२:३४ ते ०३:१८ पर्यंत राहील.

‘या’ राशींसाठी भाग्यवान आहे सोन्याची अंगठी; आनंदाच्या मार्गातील अडथळे होतात दूर

अक्षय तृतीयेचा दिवस शुभ कार्यासाठी खूप चांगला आहे. याशिवाय नवीन कपडे, दागिने, घर-गाडी इत्यादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी देखील हा दिवस शुभ मनाला जातो. या दिवशी धार्मिक कार्यक्रमही होतात. महाराष्ट्र, राजस्थानसह काही राज्यांमध्ये या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी सोने-चांदी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. एवढेच नाही तर या दिवशी दान करण्यालाही खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान घराला आशीर्वाद देते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya tritiya 2022 know the date importance reason of celebrating akshaya tritiya in india maharashtra pvp