Akshaya Tritiya 2023: दिनांक २२ एप्रिल २०२३ ला अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशित रवी-राहु युती होत असल्यामुळे हा मुहूर्त थोडासा कलुषित झालेला आहे. ही युती प्लुटोच्या केंद्रात होत आहे हा अजून एक कुयोग आहे. मात्र नुकताच मेष राशीत गुरु आल्यानं, कुयोगांची तीव्रता जरी कमी होणार आहे. असे असले तरी गुरु अस्तंगत असून २७ एप्रिलला त्याचा उदय होत आहे. असे सर्व असले तरी सर्व ग्रह, त्यांच्या स्वतः च्या कारकत्वानुसार माणसाला पैसे देतात. या अक्षय्य तृतीयेला जनतेने जसे धन मिळवायचे आहे, तसेच त्याचे दानही करावयाचे आहे हे लक्षात ठेवावे.

अक्षय्य तृतीयेला काय करावे, काय करू नये? (Akshaya Tritiya Do’s & Dont’s)

विवाह, मुंज, डोहाळे जेवण, नूतन ग्रह प्रवेश ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी हा दिवस टाळावा. इतर सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणजेच नवीन काही शिकण्यासाठी, जप, दानधर्म सत्कर्म करण्यासाठी ह्या दिवसाचा उपयोग करावा. समाजाचे, गुरुचे ऋण फेडण्यासाठी या दिवसाचा उपयोग करावा.

अक्षय्य तृतीयेला ‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

या वर्षी या अक्षय तृतीयेला मेष राशीत पंचग्रही म्हणजे रवी, गुरु, बुध, राहू, हर्षल हे एकत्र आल्यानं मेष, सिंह, धनु, मिथुन, कुंभ राशींसाठी जीवनातील सर्व संधी सहजपणे मिळू शकतात. मीन आणि कर्क राशीसाठी आर्थिक भाग्योदय होईल. तुला आणि मकर राशींना कष्टाचे सकारात्मक फळ मिळू शकते. वृषभ, कन्या, वृश्चिक या राशींना या पंचग्रहीचा मोठा उपयोग होणार नाही. मात्र यातील कन्या राशीला आर्थिक लाभ होतील. दिर्घकाळापासून ज्या आर्थिक आणि मानसिक समस्या होत्या त्या दूर होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयी प्राप्त होऊ शकतात. कुंडलीत राजयोग तयार होतोय, ज्यामुळे या लोकांना धनलाभासह प्रतिष्ठाही मिळू शकते. शिवाय वृषभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची राहू शकते.

हे ही वाचा<< ४८ तासात गुरू अश्विनी नक्षत्रात येऊन ‘या’ ४ राशी होतील प्रचंड श्रीमंत? धनलाभासह आनंद येऊ शकतो दारी

हे मात्र खरे की या अक्षय तृतीयेला गुरूचा प्रवेश मेष राशीत झाल्याने चैतन्याचे शिंपण मात्र सर्वत्र होणार आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader