Akshaya Tritiya 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. पंचांगानुसार, चंद्र २९ एप्रिल रोजी पहाटे २ वाजून ५३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल आणि १ मे पर्यंत या राशीत राहील. या काळात चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल तसेच ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. अक्षय्य तृतीयेच्या काळात निर्माण होणारा गजकेसरी राजयोग काही राशींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या योगाच्या प्रभावाने भाग्यशाली राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी गजकेसरी योग खूप लाभदायी सिद्ध होईल. मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. धार्मिक कामात मन रमेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
वृषभ (Vrushabh Rashi)
गजकेसरी राजयोग वृषभ राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
धनु (Dhanu Rashi)
हा राजयोग धनु राशीसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त करण्यास मदत मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त होण्यास मदत मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)