Akshaya Tritiya 2025 Gajkesari Rajyog : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी, तुम्ही कोणत्याही शुभ वेळेची वाट न पाहता कोणतेही काम करून यश मिळवू शकता. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, तसेच सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या वर्षी अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी येत आहे. या दिवशी अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय तृतीयेला गजकेसरी, लक्ष्मी नारायण योग ते मालव्य राजयोग, चर्तुग्रही राजयोग तयार होत आहेत. या शुभ योगांच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना लाभ होतील. या राशींवर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहू शकतात, ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल…
अक्षय तृतीयेचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल शुभ ( Akshaya Tritiya 2025 Gajkesari, Lakshmi Narayan, Malvaya Rajyog Horoscope)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी शनि, बुध, शुक्र आणि राहू मीन राशीत असतील, त्यामुळे चतुर्ग्रही योगासह मालव्य, लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. यासह चंद्र वृषभ राशीत गुरुबरोबर विराजमान असेल, ज्यामुळे गजकेसरी राजयोग देखील तयार होत आहे. यासह या दिवशी रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे.
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप खास असू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवता येऊ शकते. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात. बेरोजगारांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहेत. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा योग्य वेळ असू शकतो.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फलदायी ठरु शकतो. या काळात मीन राशीच्या लोकांना नोकरीत भरपूर फायदा होऊ शकतो. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. यासह बराच काळ अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो. यासह तुमची नेतृत्व क्षमता वाढेल, ज्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी सुख, आनंद नांदेल.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांनाही बरेच फायदे मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. यासह आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते. तसेच तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते सुधारेल.