Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीया हिंदू धर्मातील सर्वांत शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता, शुभ कार्ये केली जाते. या वर्षी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप खास आहे. कारण- ग्रहांच्या स्थितीनुसार, या दिवशी अनेक मोठे राजयोग तयार होत आहेत. या दिवशी वृषभ राशीत गुरू आणि चंद्राची युती होत आहे, ज्यामुळे गजकेसरी राजयोगाची निर्मिती होत आहे; तर अक्षय योगदेखील तयार होत आहे. त्याशिवाय मीन राशीत चतुर्ग्रही, मालव्य व लक्ष्मी नारायण हे राजयोग तयार होत आहेत. या राजयोगांमुळे १२ पैकी तीन राशींना भरपूर फायदे मिळू शकतात. तर, चला जाणून घेऊ या भाग्यवान राशींबद्दल…
अक्षय्य तृतीयेची तिथी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार ३० एप्रिल (बुधवार) रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल.
धनू (Sagittarius Zodiac Sign)
अक्षय्य तृतीयेचा दिवस धनुूराशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. त्यासह देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात अपार यश, तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर नियंत्रण मिळवू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. कुटुंबातही आनंद आणि शांती राहील. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे.
सिंह (Leo Zodiac Sign)
अक्षय्य तृतीयेचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट्स मिळू शकतात. तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना खूप फायदे मिळू शकतात. अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. नोकरीत बढती अन् पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
वृषभ (Taurus Zodiac Sign)
अक्षय्य तृतीयेचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू असू शकतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश आणि आर्थिक लाभ मिळू शकेल. आदर आणि सन्मानात झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. त्यासह नोकरीत पगारवाढीसह पदोन्नतीही मिळू शकते. अध्यात्माकडे कल असू शकतो, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)