Shani Nakshtra Gochar 2025 : कर्मफळदाता शनि हा नऊ ग्रहांपैकी सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या शनि ग्रहाला दुःख, रोग, संघर्ष, तंत्रज्ञान, परम तपस्वी, मृत्यू आणि नोकरीचा कारक ग्रह मानला जातो. शनीचा राशी किंवा नक्षत्र बदल १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या परिणाम करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि सुमारे अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. सुमारे एक वर्षानंतर तो नक्षत्र बदल करतो, सध्या शनि मीन राशीत आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात स्थित आहे. अक्षय तृतीयेच्या आधी, म्हणजे २८ एप्रिल रोजी, तो नक्षत्र बदल करुन उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनि स्वतःच्या नक्षत्रातील प्रवेशाने १२ पैकी ३ राशींना भरपूर फायदा मिळू शकतो, या ३ भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊ….

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल आणि ३ ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहील. उत्तर भाद्रपद हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी २६ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शनि आहे आणि राशी मीन आहे.

मिथुन राशी (Gemini Zodiac Sign)

मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करू शकाल. तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होऊ शकते. जीवनात आनंद आणि शांती नांदेल. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. तुम्ही अनेक कामांमध्ये यशस्वी होऊ शकता.

वृषभ राशी (Taurus Zodiac Sign)

वृषभ राशीच्या लोकांसाठी, शनीचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे फायदे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. नोकरीत तुम्हाला येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. याच्या मदतीने तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला खूप यश मिळू शकेल. लांबच्या प्रवासातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. एखाद्याला शिस्तबद्ध जीवन जगायला आवडेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आता पूर्ण होऊ शकते. आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकतं.

कुंभ राशी (Aquarius Zodiac Sign)

कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तर भाद्रपद नक्षत्रातील शनीची प्रवेश शुभ ठरु शकतो. या राशीच्या लोकांच्या नशीबातही आनंद येऊ शकतो. अनेक क्षेत्रात मोठे बदल दिसून येऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळू शकेल. तुमच्या कामाने सर्वांना प्रेरणा मिळू शकते. परदेशातूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. यामुळे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आरोग्य देखील पूर्वीपेक्षा चांगले असू शकते.