Akshaya Tritiya 2025 Shubh Yoga : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. याला अबुझ मुहूर्त असेही म्हणतात, म्हणजेच कोणताही शुभ काळ न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येते. यावेळी ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी ग्रहांचा विशेष योगायोगही घडत आहे. वैदिक पंचांगानुसार, २४ वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला अक्षय योग निर्माण होत आहे. यापूर्वी २००१ मध्ये असा योग निर्माण झाला होता. यावेळी चंद्रदेखील वृषभ राशीत गुरुशी युती करून गजकेसरी योग तयार करत आहे. यामुळे अक्षय्य तृतीयेला १२ पैकी ३ राशींना अक्षय योगाचा विशेष फायदा होणार आहे. नेमका कोणत्या राशींना हा अक्षय योग फलदायी ठरू शकतो जाणून घेऊ…

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप फायदेशीर ठरू शकतो. या दिवशी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगली बढती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी नवीन संधीदेखील चालून येतील, ज्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ खूप शुभ आहे. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. कुटुंबात आनंद आणि समृद्धी येईल आणि पालक, जोडीदार आणि मुलांशी असलेले संबंध मजबूत होतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया ही वरदानापेक्षा कमी नसेल. तुमचे पूर्वीचे रखडलेले काम आता लवकर पूर्ण होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांनाही चांगले फायदे मिळू शकतात. या दिवशी सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. घरात आनंदी वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला तुमचे जुने मित्र आणि नातेवाईक भेटतील, ज्यामुळे मन आनंदी राहील. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील.

धनू (Sagittarius)

अक्षय्य तृतीया हा धनु राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. जर कोणताही कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यातही तुमच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता आहेत. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. तुमची प्रगती पाहून शत्रूही आश्चर्यचकित होतील. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला कमाईच्या नवीन संधी मिळतील आणि कुटुंबात सुरू असलेला तणावही संपू शकेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. मुलांकडूनही तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल.